अबब! बँकेत चक्क 500 रुपयांच्या बनावट नोटांचा भरणा

दौंड, 23 नोव्हेंबरः दौंड शहरातील एचडीएफसी बँक शाखेच्या यंत्रात रोख भरणा करताना 500 रुपयांच्या 53 बनावट नोटा आढळून आल्या आहेत. दौंड शहरासह तालुक्यात बनावट नोटा तयार करून त्याचे वितरण करणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याने दुकानदारांसह सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, शहाजी कापसे यांनी त्यांच्या पत्नी अश्विनी कापसे (रा. देऊळगाव राजे, ता. दौंड) यांच्या बँक खात्यात रोकड भरताना हा प्रकार उघडकीस आला. एका अज्ञाताने शहाजी कापसे यांना दिलेल्या नोटांमध्ये या बनावट नोटा आढळून आल्या. शहरातील एचडीएफसी बँक शाखेतील कॅश डिपॉझिट यंत्रामध्ये 19 नोव्हेंबर 2022 रोजी शहाजी कापसे यांनी 27 हजार रुपयांचा भरणा केला. मात्र रोकड भरल्यानंतर मोबाइल क्रमांकावर त्या संदर्भात मॅसेज आला नसल्याने त्यांनी बँक मॅनेजरकडे चौकशी केली. बँक प्रशासनाने यंत्र उघडून पाहणी केली असता त्यामध्ये भरणा केलेल्या 500 रुपयांच्या तब्बल 54 नोटांपैकी 53 नोटा बनावट असल्याचे आढळल्या.

अल्पवयीन मोटरसायकल चालकांच्या पालकांवर कारवाई

या प्रकरणी एचडीएफसी बॅंकेचे शाखा मॅनेजर अनुप भोसले यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात नोट बनावट असल्याचे माहित असणे किंवा तसे समजण्यास कारण असून देखील ती खरी नोट म्हणून वापरणे अन्वये अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सदर बनावट नोटा कापसे यांना कोणी व का दिल्या? हे तपासात निष्पन्न केले जाईल, अशी माहिती तपास अधिकारी सुनिता चवरे यांनी माध्यमांना दिली.

बारामतीमधील बेशिस्त रिक्षांवर पोलिसांची कारवाई

One Comment on “अबब! बँकेत चक्क 500 रुपयांच्या बनावट नोटांचा भरणा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *