हिमाचल प्रदेशात ढगफुटीमुळे 50 जण बेपत्ता, बचावकार्य सुरू

शिमला, 01 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यात गुरूवारी (दि. 01) ढगफुटी झाली. या ढगफुटीनंतर येथील 50 लोक बेपत्ता झाले आहेत. तसेच 2 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. शिमला जिल्ह्यातील रामपूर तालुका, मंडी जिल्ह्यातील पदर तालुका आणि कुलू, निर्मंद येथील जाओन गावात ढगफुटी आज पहाटे 4.40 च्या सुमारास एकाच वेळी ढगफुटी झाली. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले. तसेच यामुळे नागरिकांची घरे आणि शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर येत्या 36 तासांत येथे मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

https://x.com/AHindinews/status/1818889642575643070?s=19

https://x.com/SukhuSukhvinder/status/1818871954671386730?s=19

मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस, होमगार्ड आणि अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी पाचारण केले. सध्या याठिकाणी त्यांच्याकडून मदत, शोध आणि बचाव कार्य केले जात आहे. या घटनेनंतर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी बचाव कार्यासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तसेच हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी याबाबत ट्विट केले आहे. याठिकाणी ढगफुटीनंतर 50 हून अधिक लोक बेपत्ता आहेत आणि आतापर्यंत 2 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. तसेच या स्थानिक प्रशासनाला मदत आणि बचाव कार्य सुरळीत पार पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून मदत आणि बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहे. राज्य सरकार सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध आहे, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

https://x.com/AHindinews/status/1818876611757846914?s=19

अमित शाहांनी परिस्थितीची माहिती घेतली

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिमाचल प्रदेशातील ढगफुटीनंतर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी गृहमंत्र्यांनी येथील परिस्थितीची सर्व माहिती मुख्यमंत्र्यांकडून जाणून घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला केंद्रीय मदत आणि पाठबळ देण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *