आयुर्वेदिक सिरप प्यायल्याने 5 जणांचा मृत्यू

खेडा, 30 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) गुजरातमध्ये आयुर्वेदिक सिरप प्यायल्याने 5 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर एका व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गुजरातच्या खेडा जिल्ह्यात ही घटना घडली. हे मृत व्यक्ती गुजरातमधील बिलोदरा आणि बागडू गावातील रहिवासी आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यामध्ये एका किराणा दुकानदाराचा देखील समावेश आहे. तर याप्रकरणाचा तपास सध्या पोलीस करीत आहेत.

सत्ताधारी जातीयवाद पसरवत आहेत – विजय वडेट्टीवार

दरम्यान, गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील बिलोदरा गावातील किराणा दुकानदाराने हे आयुर्वेदिक सिरप विक्रीसाठी त्याच्या दुकानात ठेवले होते. यावेळी त्याने हे सिरप सुमारे 50 ते 60 लोकांना विकल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्यामधील 5 जणांचा मृत्यू झाला तर एका व्यक्तीची प्रकृती सध्या गंभीर आहे. याप्रकरणी, हे आयुर्वेदिक सिरप विकणारा दुकानदार आणि इतर दोघांना पोलीसांनी अटक केली आहे. सध्या त्यांची कसून चौकशी केली जात आहे. हे सिरप अहमदाबादच्या जुहापुरा भागातील एका कारखान्यात बनवले जात होते. तर ते या कारखान्यातून ग्रामीण भागांतील दुकानांत विक्रीसाठी पाठवले जात होते. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला

तत्पूर्वी, या आयुर्वेदिक सिरपची अन्न व औषध विभागाच्या वतीने तपासणी केली केली जात आहे. तर रुग्णालयात दाखल केलेल्या व्यक्तीच्या रक्ताच्या नमुन्यात मिथाईल अल्कोहोल आढळून आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर या किराणा दुकानातून 50 पेक्षा अधिक लोकांनी हे आयुर्वेदिक सिरप विकत घेतले होते. यापैकी 6 लोकानांच त्याचा त्रास कसा काय झाला? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम पोलीस आणि अन्न व औषध विभाग करीत आहेत.

One Comment on “आयुर्वेदिक सिरप प्यायल्याने 5 जणांचा मृत्यू”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *