दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 5 भारतीय जवान शहीद, 5 जवान जखमी

जम्मू-काश्मीर, 09 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात सोमवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे 5 जवान शहीद झाले. तर 5 जवान जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या पाच जवानांवर पठाणकोट येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान कठुआ जिल्ह्यातील माचेडी भागात सोमवारी दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला होता. कठुआ जिल्ह्यातील माचेडी-मल्हार रस्त्याववरून लष्कराचे वाहन नियमित गस्तीवर असताना काल दुपारी 3.30 च्या सुमारास ही घटना घडली.

https://x.com/AHindinews/status/1810269446713618942?s=19

https://x.com/AHindinews/status/1810466395617984970?s=19

https://x.com/AHindinews/status/1810356946178027659?s=19

https://x.com/AHindinews/status/1810514152596845024?s=19

परिसरात शोध मोहीम सुरू

या हल्ल्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली. त्यावेळी दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक सुरू झाली. त्यानंतर या परिसरातून दहशतवादी पळून गेले आहेत. त्यांचा सध्या शोध घेतला जात आहे. या हल्ल्यात तीन दहशतवाद्यांचा समावेश होता. त्यांनी सीमेपलीकडून घुसखोरी केली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कालपासून कठुआच्या माचेडी भागात शोध मोहीम चालू आहे. या पार्श्वभूमीवर, उधमपूरमधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

https://x.com/rajnathsingh/status/1810505908608479716?s=19

राजनाथ सिंह यांची शहिदांना श्रद्धांजली

दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील बडनोटा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्कराचे पाच जवान शहीद झाल्यामुळे मला खूप दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो, या कठीण काळात देश त्यांच्या पाठीशी उभा आहे. दहशतवादविरोधी कारवाया सुरू आहेत आणि आमच्या सैन्याने परिसरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचा निर्धार केला आहे. य क्रूर दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असे राजनाथ सिंह यावेळी म्हणाले आहेत.

https://x.com/rashtrapatibhvn/status/1810546080251330713?s=19

राष्ट्रपतींनी केला तीव्र शब्दांत निषेध

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्विट करून या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हे भ्याड कृत्य आहे, ज्याचा निषेध केला पाहिजे आणि कठोर कारवाई झालीच पाहिजे. माझे विचार त्या शूर जवानांच्या कुटुंबियांसोबत आहेत ज्यांनी दहशतवादाविरुद्ध चालू असलेल्या या युद्धात सर्व प्रकारच्या प्राणांची आहुती दिली आहे. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करते, असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *