बारामती तालुक्यात 4500 गरीब रेशन कार्डधारक हद्दपार!

बारामती, 5 फेब्रुवारीः बारामती तालुक्यात तब्बल 4500 रेशन कार्डधारक कुटुंब पुरवठा विभागाच्या टक्केवारी कारभारामुळे रेशन कार्ड धान्यापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रेशन कार्डवर कुटुंबाच्या असणारी संख्यांच्या प्रमाणात मोफत धान्य वाटपाचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.

कोणीही गरीब अर्धापोटी राहू नये किंवा उपाशी मरू नये, कुपोषणाचा प्रश्न कायमचा मिटवावा, म्हणून केंद्र शासनाने लोक अभिमुख योजना अंमलात आणली. परंतु बारामती तालुक्यात पुरवठा विभाग गोरगरीबांना रेशनाच्या अन्न धान्यापासून वंचित ठेवण्याचा काटकारस्थान करण्याचा कट करीत आहे.

पार्लरसाठी आली अन् चोरले दागिने

विकतचे धान्य बंद झाल्यामुळे रेशन कार्ड दुकानदार धान्य चलन काढायला तहसील कार्यालयामध्ये येणार नाही. त्यामुळे मिळणारी वर कमाई बंद झाली आहे. परिणामी, नवीन शक्कल काढले जात आहेत, जे रेशन दुकानदार टक्केवारी देणार त्यांना वेळेत धान्य पोहोच केले जाते व त्यांचा डाटाबेस तत्काळ उपलब्ध केला जातो. परंतु जे रेशन दुकानदार टक्केवारी देत नाहीत, अशांचे धान्य वेळेत पुरवठा केला जात नाही.

जरी धान्य दिले तरी निष्कृष्ट दर्जाचा दिलं जातं. यातच एकच कुटुंबातील एका व्यक्तीचा आधार लिंक झाले नसेल तर संपूर्ण रेशन कार्डधारकाचं अन्न धान्य बंद केले जाते. त्यामुळे तालुक्यात तब्बल 4500 रेशन कार्डधारक कुटुंब मोफत अन्न धान्यापासून बाबूगिरींच्या हलगर्जीमुळे वंचित राहणार आहेत.

बारामतीत वृक्षतोडीचा काळाबाजार?

One Comment on “बारामती तालुक्यात 4500 गरीब रेशन कार्डधारक हद्दपार!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *