उत्तरकाशी, 28 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथे बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. हे मजूर गेल्या 17 दिवसांपासून उत्तरकाशी येथील सिल्कियारा बोगद्यात अडकले होते. तेंव्हापासून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात होते. या बचावकार्यात अनेक प्रकारचे अडथळे आले. मात्र, या सगळ्या अडथळ्यांवर मात करून सर्व मजुरांना बोगद्यातून बाहेर काढण्यात जवानांना यश आले आणि ही बचावकार्याची मोहीम अखेर आज पूर्ण झाली. सिल्कियारा बोगद्यातून सुखरूप सुटका करण्यात आलेल्या कामगारांना आता रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व मजुरांच्या प्रकृतीकडे प्रशासनाचे लक्ष आहे.
All 41 workers trapped inside the Silkyara tunnel in Uttarakhand since November 12, have been successfully rescued. pic.twitter.com/xQq2EfAPuq
— ANI (@ANI) November 28, 2023
महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते माहिती पत्रक आणि पोस्टरचे अनावरण
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरकाशीच्या सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या बचावकार्याच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. “उत्तरकाशीतील आमच्या मजूर बांधवांच्या बचावकार्याचे यश सर्वांनाच भावूक करत आहे. बोगद्यात अडकलेल्या मित्रांना मी सांगू इच्छितो की तुमचे धैर्य आणि संयम सर्वांना प्रेरणा देत आहे. मी तुम्हा सर्वांना चांगले आरोग्य इच्छितो. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आमचे हे मित्र आता त्यांच्या प्रियजनांना भेटणार आहेत ही समाधानाची बाब आहे. या आव्हानात्मक काळात या सर्व कुटुंबांनी दाखवलेल्या संयमाचे आणि धैर्याचे कौतुक करता येणार नाही. या बचाव कार्याशी संबंधित सर्व लोकांच्या आत्म्याला मी सलाम करतो. त्यांच्या शौर्याने आणि जिद्दीने आमच्या कामगार बांधवांना नवसंजीवनी दिली आहे. या मिशनमध्ये सामील असलेल्या प्रत्येकाने माणुसकी आणि टीमवर्कचे एक अद्भुत उदाहरण ठेवले आहे.” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
उत्तरकाशी में हमारे श्रमिक भाइयों के रेस्क्यू ऑपरेशन की सफलता हर किसी को भावुक कर देने वाली है।
— Narendra Modi (@narendramodi) November 28, 2023
टनल में जो साथी फंसे हुए थे, उनसे मैं कहना चाहता हूं कि आपका साहस और धैर्य हर किसी को प्रेरित कर रहा है। मैं आप सभी की कुशलता और उत्तम स्वास्थ्य की कामना करता हूं।
यह अत्यंत…
पत्नी आणि मुलाचा खून करून स्वतःचे जीवन संपवले; शिक्षकाचे टोकाचे पाऊल
तसेच देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील याबाबत एक ट्विट केले आहे. “उत्तराखंडमधील बोगद्यात अडकलेल्या सर्व कामगारांची सुटका करण्यात आल्याचे ऐकून मला दिलासा मिळाला आणि आनंद झाला आहे. बचाव कार्यात अडथळे आल्याने त्यांचा 17 दिवसांचा त्रास मानवी सहनशक्तीचा दाखला आहे. देश त्यांच्या लवचिकतेला सलाम करतो आणि त्यांच्या घरापासून खूप दूर, अत्यंत वैयक्तिक जोखमीवरही, गंभीर पायाभूत सुविधा निर्माण केल्याबद्दल त्यांचे आभारी आहे. मी त्या संघांचे आणि सर्व तज्ञांचे अभिनंदन करते ज्यांनी इतिहासातील सर्वात कठीण बचाव मोहिमेपैकी एक करण्यासाठी अविश्वसनीय धैर्याने आणि दृढनिश्चयाने काम केले आहे.” असे राष्ट्रपतींनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
I feel relieved and happy to learn that all the workers trapped in a tunnel in Uttarakhand have been rescued. Their travails over 17 days, as the rescue effort met with obstacles, have been a testament of human endurance. The nation salutes their resilience and remains grateful…
— President of India (@rashtrapatibhvn) November 28, 2023
One Comment on “बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना सुखरूप बाहेर काढले”