रशियामध्ये जळगावातील 4 विद्यार्थ्यांचा नदीत बुडून मृत्यू; भारतीय दूतावासाने केल्या मार्गदर्शक सूचना जारी

रशिया, 08 जून: (विश्वजीत खाटमोडे) रशियामध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या बुडून मृत्यू झाल्याच्या घटनांनंतर रशियातील भारतीय दूतावासाने रशिया मधील भारतीय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान, रशियात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या 4 भारतीय विद्यार्थ्यांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे सर्व विद्यार्थी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. रशियातील सेंट पीटर्सबर्ग जवळील नदीत पाच विद्यार्थी बुडाले होते. त्यापैकी एका विद्यार्थ्याचे प्राण रशियातील अधिकाऱ्यांनी वाचवले असून, यामध्ये चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

https://twitter.com/ANI/status/1799109947462209897?s=19

भारतीय दूतावासाने काय म्हटले?

या पार्श्वभूमीवर, भारतीय दूतावासाने रशियातील भारतीय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रशियात भारतीय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना वेळोवेळी घडत आहेत. यावर्षी अशा घटनांमध्ये चार भारतीय विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 2023 मध्ये अशा दोन घटना घडल्या आहेत. तसेच 2022 मध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या सहा घटना घडल्या होत्या. त्यामुळे दूतावास रशियातील भारतीय विद्यार्थ्यांना समुद्रकिनारे, नद्या, तलाव, तलाव आणि इतर जलकुंभांवर जाताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करीत आहे. तसेच विद्यार्थ्यांना या संदर्भात सर्व आवश्यक खबरदारी आणि सुरक्षिततेच्या उपायांचा सल्ला देण्यात आला आहे, असे येथील भारतीय दूतावासाने यामध्ये म्हटले आहे.

https://twitter.com/ANI/status/1798998913548193886?s=19

चार विद्यार्थ्यांचा मृत्यू

दरम्यान, हे सर्व विद्यार्थी रशियातील सेंट पीटर्सबर्ग जवळील वोल्खोव्ह नदीच्या किनारी फेरफटका मारत होते. त्यावेळी अचानकपणे मोठी लाट आली. या लाटेमुळे हे सर्व विद्यार्थी पाण्यात बुडाले. त्यापैकी एका विद्यार्थ्याचे प्राण रशियातील अधिकाऱ्यांनी वाचवले असून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या विद्यार्थ्यांचे मृतदेह भारतात आणण्याची प्रकिया सध्या सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनेमुळे पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *