भीषण अपघातात 4 ठार आणि 15 हून अधिक जण जखमी

तामिळनाडू, 16 मे: (विश्वजीत खाटमोडे) तामिळनाडू राज्यातील चेन्नई-त्रिची राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. चेन्नई-त्रिची राष्ट्रीय महामार्गावरील मदुरांतकम येथे बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत.

https://twitter.com/ANI/status/1790919703071953402?s=19

नियंत्रण सुटल्याने अपघात

ह्या अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींवर सध्या चेंगलपट्टू शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच ता अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दरम्यान, ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसचे नियंत्रण सुटल्याने ही बस एका ट्रकला धडकल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अपघाताचा तपास सध्या पोलीस करीत आहेत.

https://twitter.com/ANI/status/1790862175600562341?s=19

मध्य प्रदेशात देखील भीषण अपघात

तत्पूर्वी, मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील इंदूर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री उशिरा एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. बोलेरो एसयूव्हीचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच एक जण जखमी झाला आहे. गाडीचा टायर फुटल्याने भरधाव वेगात असलेली बोलेरो गाडी एका मोठ्या वाहनाला धडकली. यामध्ये बोलेरोमध्ये प्रवास करणाऱ्या आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये एका पोलीस हवालदाराचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *