मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील 4 आरोपी जेरबंद

बारामती, 4 जुलैः मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात 4 आरोपींना पकडण्यात वडगांव निंबाळकर पोलिसांना मोठे यश आले आहे. सदर चोरीच्या प्रकरणात सुरज घमंडे (वय 20, रा. सावंतवस्ती वाघळवाडी, ता.बारामती), शिवराज फाळके (वय 19, रा.पवार हाउस सातारा रोड, ता. कोरेगाव, जि. सातारा), किशोर माने (वय 20, रा. तडवळे, ता, कोरेगाव जि. सातारा), अभिजीत राऊत (वय 20, रा. आझादपूर, ता. कोरेगाव जि. सातारा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या आरोपींवर भा.द.वि.च्या विविध कलमानुसार गुन्हा नोंदविला आहे. तसेच संशयित आरोपीकडून दोन मोटारसायकलही जप्त करण्यात आल्या आहे.

दरम्यान, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजेपुल गावातील 1 लाख 90 हजार रुपयांची बुलेट आणि 1 लाख 25 हजार रुपयांची पल्सर अशा दोन मोटार सायकली चोरीला गेल्या होत्या. सदर चोरीतील मोटार सायकली या सातारा शहरात फिरत असल्याचे सातार पोलिसांना समजले. सातारा पोलिसांनी या प्रकरणात वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनला संपर्क साधला. या प्रकरणात अधिक तपास केला असता सदर मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला.

सदर चोरी प्रकरणात पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभागचे अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहीते, बारामती उपविभागचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोलीस हवालदार रमेश नागटिळक, पोलीस नाईक नितीन बोराडे, पोलीस कॉन्स्टेबल महादेव साळुंके यांच्या पथकाने कामगिरी केली आहे.

अखेर बारामतीत प्लास्टिक बंदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *