मुंबई, 10 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे. यासाठी विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात एकूण 1 हजार 700 कोटी 73 लाख रुपये पीक विमा वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. राज्यातील 35 लाख 08 हजार 303 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. तर ही पिक विम्याची रक्कम दिवाळीपूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. त्यानूसार, विमा कंपन्यांनी ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
मुर्टी गावात दिवाळीनिमित्त परिवर्तन व्याख्यानमालेचे आयोजन
दरम्यान यंदाच्या खरीप हंगामात हवामानाच्या असमतोलामुळे राज्यातील अनेक भागांतील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर राज्यात यावर्षी 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी विक्रमी पीक विमा काढला होता. यामध्ये आंतरपिकाचा पण विमा काढण्यात आला आहे. त्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्याला एक रुपया भरायला सांगितला होता. तर यावेळी उर्वरित विम्याचा प्रीमियम राज्य सरकारने भरला होता. त्यानंतर शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पीक विमा देण्यात यावा असे आदेश राज्य सरकारने सबंधित विमा कंपन्यांना दिले होते. त्यानूसार विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात 1 हजार 700 कोटी 73 लाख रुपये पीक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. तर येत्या काळात आणखी शेतकऱ्यांना या पिक विम्याचा लाभ होणार आहे.
न्यूझीलंडचा श्रीलंकेवर विजय; न्यूझीलंड उपांत्य फेरीच्या शर्यतीत
तत्पूर्वी धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम पीक विमा मिळाला नाही, तर आपणही दिवाळी साजरी करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र त्यांनी दिलेला शब्द आता पूर्ण केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर शेतकऱ्यांचा विमा प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावा, यासाठी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत संबंधित विमा कंपन्यांना आदेश दिले होते. त्यानूसार, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरूवात झाली आहे.
One Comment on “राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार”