माळेगाव साखर कारखान्यांकडून 3100 रुपयांचा दर जाहीर

बारामती, 25 ऑगस्टः बारामती तालुक्यातील माळेगाव आणि सोमेश्वर या दोन सहकारी साखर कारखान्यांमध्ये नेहमीच ऊस दरावरून चढाओढ सुरू असते. आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम 2021-22 चा अंतिम ऊस दर प्रतिटन 3100 रुपये जाहीर करण्यात आला.

सामुहिक अत्याचार प्रकरणात भाजपचे बारामती शहर पोलीस स्टेशनला निवेदन

हा ऊस दर संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी जाहीर केला. या आगोदर कारखान्याने एफआरपीचे 2780 आणि कांडे बिल 100 रुपये असे एकूण प्रतिटन 2880 रुपये ऊस उत्पादक सभासदांना दिले आहेत. आता उर्वरीत 220 रुपये प्रतिटन दिवाळीच्या दरम्यान देण्यात येणार आहेत.

नुकताच सोमेश्वर कारखान्याने गेल्या वर्षीच्या अंतिम टनाला 3020 रुपये दर जाहीर केला आहे. यंदा सोमेश्वर पेक्षा माळेगाव कारखान्याने टनाला 80 रुपये जास्त दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *