पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघात 303 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात! पहा संपूर्ण यादी

पुणे, 05 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी (दि.04) समाप्त झाली आहे. त्यामुळे निवडणुकीतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघात एकूण 303 उमेदवार रिंगणात उभे आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात 482 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 179 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. अशी माहिती पुणे जिल्हा विभागीय माहिती कार्यालयाने दिली आहे. यामध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 24 उमेदवार आहेत. तर बारामती मतदारसंघात 23 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उभे आहेत.

https://x.com/InfoDivPune/status/1853418197434663030?t=DoNsnogxBmrvZIJ28IfQGw&s=19

जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघामध्ये किती उमेदवार उभे?

1) विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर मतदारसंघात 17 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील 6 उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे जुन्नरमध्ये 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
2) आंबेगावमध्ये 17 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 6 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. त्यामुळे आंबेगावमध्ये देखील 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
3) खेड आळंदी मतदारसंघात 22 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 9 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्याने 13 उमेदवार सध्या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
4) शिरूर मतदारसंघात 25 उमेदवारांनी त्यांचे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 14 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्याने शिरूरमध्ये सध्या 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.



5) दौंड मतदारसंघात 20 उमेदवारांनी त्यांचे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 6 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्याने दौंडमध्ये सध्या 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
6) इंदापूर मतदारसंघात 34 उमेदवारांनी त्यांचे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 10 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्याने इंदापूरमध्ये सध्या 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
7) बारामती मतदारसंघात 32 उमेदवारांनी त्यांचे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 9 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्याने बारामतीत सध्या 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
8) पुरंदर मतदारसंघात 26 उमेदवारांनी त्यांचे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 10 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्याने पुरंदरमध्ये सध्या 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
9) भोर मतदारसंघात 15 उमेदवारांनी त्यांचे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 9 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्याने भोरमध्ये सध्या 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
10) मावळ मतदारसंघात 12 उमेदवारांनी त्यांचे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 9 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्याने मावळमध्ये सध्या 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
11) चिंचवड मतदारसंघात 28 उमेदवारांनी त्यांचे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 7 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्याने चिंचवडमध्ये सध्या 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
12) पिंपरी मतदारसंघात 36 उमेदवारांनी त्यांचे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 21 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्याने पिंपरीमध्ये सध्या 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
13) भोसरी मतदारसंघात 18 उमेदवारांनी त्यांचे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 7 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्याने भोसरीमध्ये सध्या 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
14) वडगाव शेरी मतदारसंघात 24 उमेदवारांनी त्यांचे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 8 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्याने वडगाव शेरी मध्ये सध्या 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
15) शिवाजीनगर मतदारसंघात 20 उमेदवारांनी त्यांचे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 7 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्याने शिवाजीनगर मध्ये सध्या 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
16) कोथरूड मतदारसंघात 21 उमेदवारांनी त्यांचे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 9 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्याने कोथरूड मध्ये सध्या 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
17) खडकवासला मतदारसंघात 24 उमेदवारांनी त्यांचे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 10 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्याने खडकवासला मध्ये सध्या 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
18) पर्वती मतदारसंघात 20 उमेदवारांनी त्यांचे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 5 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्याने पर्वती मध्ये सध्या 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
19) हडपसर मतदारसंघात 31 उमेदवारांनी त्यांचे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 12 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्याने हडपसरमध्ये सध्या 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
20) पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघात 26 उमेदवारांनी त्यांचे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 6 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्याने पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघात सध्या 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
21) कसबा पेठ मतदारसंघात 14 उमेदवारांनी त्यांचे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 2 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्याने कसबा पेठ मतदारसंघात सध्या 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *