शेअर बाजारात 30 लाख कोटी रुपयांचा घोटाळा? राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप

दिल्ली, 06 जून: (विश्वजीत खाटमोडे) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर भारतीय शेअर बाजारातील घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. 4 जून रोजी शेअर बाजारात 30 लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे यावेळी राहुल गांधी यांनी म्हटले आहे. शेअर बाजारातील हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घोटाळ्याच्या तपास करण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.

https://twitter.com/AHindinews/status/1798688374016053664?s=19

राहुल गांधी काय म्हणाले?

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, “निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान, गृहमंत्री आणि अर्थमंत्री यांनी शेअर बाजारावर भाष्य केल्याचे आम्ही पहिल्यांदाच पाहिले. 13 मे रोजी अमित शहा म्हणतात, 4 जूनपूर्वी शेअर्स खरेदी करा. त्यानंतर शेअर बाजार झपाट्याने वाढणार असल्याचे पंतप्रधानांनी दोन वेळा सांगितले. 19 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर बाजारात विक्रमी वाढ होणार असल्याचे म्हटले होते. तसेच मोदी 28 मे रोजी शेअर मार्केट बाबत पुन्हा असेच विधान करतात. यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही याच पद्धतीने शेअर बाजारात जोरदार वाढ होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर 1 जून रोजी मीडिया चॅनल्स खोटे असलेले एक्झिट पोल जाहीर करतात. 3 जून रोजी शेअर बाजार सर्व विक्रम मोडतो आणि 4 जून रोजी शेअर बाजार तितक्याच तेजीने खाली येतो.”

https://twitter.com/AHindinews/status/1798690759279005795?s=19

देशातील सर्वात मोठा घोटाळा

भारतीय शेअर मार्केटमध्ये 31 जून रोजी मोठ्या प्रमाणात स्टॉक गुंतवणूक झाली. या दिवशी गुंतवणूक करणाऱ्या लोक होते की, यामध्ये काहीतरी घोटाळा होणार आहे. यावेळी हजारो कोटींची गुंतवणूक झाली. मात्र, यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचे 30 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. हा भारतातील सर्वात मोठा घोटाळा आहे. असे राहुल गांधी यावेळी म्हणाले. भाजपच्या बड्या नेत्यांनी असे सांगून किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा संदेश दिला होता. भाजपला लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळणार नसल्याची तसेच एक्झिट पोल खोटे असल्याची माहिती होती. सोबतच 3 आणि 4 जूनला काय होणार? हे देखील त्यांना माहीत होते. या घोटाळ्यात 30 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, काही निवडक लोकांना हजारो कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. आम्हाला पंतप्रधान, गृहमंत्री, एक्झिट पोल करणाऱ्यांची आणि परदेशी गुंतवणूकदारांची चौकशी हवी आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *