बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळून 3 मजुरांचा मृत्यू, 3 जण जखमी

मुंबई, 05 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईत बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळण्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी बचावकार्य सुरू केले. यावेळी त्यांनी जखमी मजुरांना बाहेर काढून त्यांना रुग्णालयात दाखल केले. मुंबईतील मालाड पूर्व भागातील हाजी बापू रोडवर गुरूवारी (दि.05) दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

https://x.com/ANI/status/1831620373156392987?s=19

20 मजली इमारतीचा स्लॅब कोसळला

मुंबईतील मुंबईतील मालाड भागातील हाजी बापू रोडवर एका 20 मजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. हे बांधकाम सुरू असताना अचानकपणे इमारतीच्या 20 व्या मजल्याचा स्लॅबचा काही भाग कोसळला. त्यामुळे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 3 मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर 3 मजूर जखमी झाले आहेत. त्यानंतर जखमींना तातडीने मालाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. या दुर्घटनेच्या पोलिसांकडून तपास केला जात आहे. तर ही इमारत कशामुळे कोसळली? याचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

https://x.com/PTI_News/status/1767496964286160923

https://x.com/ANI/status/1815433813121745155

यापूर्वी ही घटना घडल्या होत्या

दरम्यान, बांधकाम सुरू असलेल्या इमारती कोसळण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या महिन्यात मुंबईतील धारावी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या भिंतीचा काही भाग शेजारील घरावर पडल्याची घटना घडली होती. या घटनेत 3 जण जखमी झाले होते. यामध्ये 2 बालकांसह एका महिलेचा समावेश होता. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच यावर्षी मार्च महिन्यात मुंबईतील बोरीवली येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा भाग कोसळून तीन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर या दुर्घटनेत एक मजूर जखमी झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *