जिल्ह्यात 27 अभियोक्तांना मिळाला विशेष सरकारी वकिलाचा दर्जा; बारामतीमधील 6 वकिलांचा समावेश

बारामती, 30 एप्रिलः पुणे जिल्ह्यातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 25(3) अन्वये 27 विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्तांना मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात नेमणुका करण्यात आल्या आहे. या 27 विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्तांमध्ये बारामतीमधील 6 वकिलांचा समावेश आहे.

पुणे आस्थापनेवर विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांची आवश्यकता होती. यामुळे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सदर 27 विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्तांची यादी तयार करून पॅनल  बनवले आहे. सदर निवड ही पुढील सहा महिन्यांकरीता असणार आहे.

या यादीत बारामतीमधील 6 वकिलांचा समावेश आहे. यात  अ‍ॅड. आदित्य रणसिंग, अ‍ॅड. गौरी अहिवळे, अ‍ॅड. अजित बनसोडे, अ‍ॅड. प्रविण कांबळे, अ‍ॅड. किर्ती कस्तुरे, अ‍ॅड. किरण सोनवणे आदी वकिलांचा समावेश आहे. या निवडीनंतर निवड झालेल्या वकिलांवर सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *