बारामती विधानसभा मतदारसंघात 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात! पहा उमेदवारांची नावे आणि चिन्ह

बारामती, 13 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) गेल्या काही दिवसांपासून राज्यात विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघातील लढतीकडे राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कारण, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बारामतीत पवार कुटुंबीय एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. या निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बारामतीचे विद्यमान आमदार अजित पवार यांचा सामना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्याशी होणार आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आहे.

एकूण 23 उमेदवार रिंगणात

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघात अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यासह एकूण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. यामध्ये मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरावरील राजकीय पक्षांचे 3 उमेदवार, नोंदणीकृत राजकीय पक्षांचे 5 उमेदवार आणि 15 अपक्ष उमेदवार यांचा समावेश आहे. या सर्व उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव, पक्ष आणि चिन्ह याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

उमेदवारांची नावे, पक्ष आणि चिन्ह

1) अजित अनंतराव पवार – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – घड्याळ
2) चंद्रकांत दादु खरात – बहुजन समाज पार्टी – हत्ती
3) युगेंद्र श्रीनिवास पवार – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार – तुतारी
4) अनुराग आदिनाथ खलाटे – भारतीय प्रजा सुराज्य पक्ष – ट्रम्पेट
5) चोपडे संदिप मारूती – राष्ट्रीय समाज पक्ष – शिट्टी
6) मंगलदास तुकाराम निकाळजे – वंचित बहुजन आघाडी – गॅस सिलेंडर
7) विनोद शिवाजीराव जगताप – संभाजी ब्रिगेड पार्टी – शिवणयंत्र
8) सोयल युनूस शहा शेख – समता पार्टी – लिफाफा
9) अब्दुलरोफ उर्फ रज्जाक जाफर मुलाणी – अपक्ष – टॉर्च
10) अभिजित महादेव कांबळे – अपक्ष – सफरचंद
11) अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले – अपक्ष – दूरदर्शन
12) अमोल नारायण चौधर – अपक्ष – किटली
13) अमोल युवराज आगवणे – अपक्ष – अंगठी
14) कल्याणी सुजितकुमार वाघमोडे – अपक्ष – ऑटो रिक्शा
15) कौशल्या संजय भंडलकर – अपक्ष – दूरध्वनी
16) चोपडे सीमा अतुल – अपक्ष – पेनाची निब सात किरणांसह
17) मिथुन सोपानराव आटोळे – अपक्ष – ऊस शेतकरी
18) विक्रम भरत कोकरे – रोड रोलर – अपक्ष
19) शिवाजी जयसिंग कोकरे – अपक्ष – टिलर
20) सचिन शंकर आगवणे – अपक्ष – ग्रामोफोन
21) सविता जगन्नाथ शिंदे – अपक्ष – हिरवी मिरची
22) संतोष पोपटराव कांबळे – अपक्ष – बॅट
23) संभाजी पांडुरंग होळकर – अपक्ष – ट्रक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *