मुंबई विमानतळावर 21 किलो सोने जप्त, सीमाशुल्क विभागाची कारवाई

मुंबई, 29 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गेल्या 7 दिवसांत जवळपास 21 किलो सोने जप्त केले आहे. या सोन्याची किंमत 13.80 कोटी रुपये इतकी आहे. याप्रकरणात एकूण 9 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर काही प्रवाशांकडून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, तंबाखू आणि सिगारेट्स जप्त केल्या आहेत. त्याची किंमत 0.23 कोटी रुपये इतकी आहे.

https://twitter.com/mumbaicus3/status/1784890926504317053?s=19

करोडो रुपयांचे सोने जप्त

मुंबई विमानतळ आयुक्तालयाच्या सीमाशुल्क विभाग युनिट तीनच्या पथकाने परदेशातून सोन्याची तस्कारी केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे. यावेळी त्यांनी मुंबई विमानतळावर 22 ते 28 एप्रिल दरम्यान 27 प्रकरणांमध्ये 20.95 किलो पेक्षा जास्त सोने जप्त केले, ज्याची किंमत 13.80 कोटी रुपये इतकी आहे. यांमधील काही प्रवाशांनी सोने शरीराच्या अवयवांमध्ये लपवलेले होते. तर काहींनी हे सोने त्यांच्या कपड्यात, सामानात आणि अंतर्वस्त्रांमध्ये लपवले होते. त्यावेळी सीमाशुल्क विभागाने काही संशयित प्रवाशांना अडवून त्यांची झडती घेतली. त्यावेळी या प्रवाशांनी परदेशातून सोने लपवून आणल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या 27 प्रकरणांमध्ये सीमाशुल्क विभागाने एकूण 9 प्रवाशांना अटक केली आहे. सध्या त्यांची चौकशी केली जात आहे.

तस्करांकडून वेगवेगळ्या युक्त्या…

दरम्यान, सोन्याची तस्करी करण्यासाठी तस्कर सध्या नवनवीन पद्धती वापरत असल्याचे आढळून आले आहे. परंतु ते सीमाशुल्क विभागाच्या नजरेतून सुटू शकत नाहीत. तस्करांनी विविध पद्धती अवलंबल्या असल्या तरीही ते तस्करी केलेले सोने आणि इतर वस्तुंसहित अनेकदा देशातील प्रमुख विमानतळांवर पकडल्याचे निदर्शनास आले आहे. अशा घटनांमध्ये यापूर्वी अनेकांना अटक झाली आहे. तरी देखील अशा घटना सातत्याने घडताना दिसून येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *