बीडमध्ये आणखी 2 नेत्यांच्या बंगल्यांना आग

बीड, 31 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध आंदोलने केले जात आहे. राज्यातील अनेक ठिकाणी या आंदोलनाला आता हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. बीडमध्ये सध्या अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संतप्त झालेल्या या आंदोलकांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या बंगल्याला आग लावल्याची घटना घडली आहे.

प्रकाश आंबेडकर यांचे जरांगे पाटलांना पत्र

याशिवाय मराठा आंदोलकांनी जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयाला आग लावली आहे. तर याच्या आधी आंदोलनकर्त्यांनी माजलगाव नगरपरिषदेला आग लावली होती. त्यामुळे बीडमध्ये सध्या तणावाचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर, याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मराठा आंदोलकांनी फासले अजित पवारांच्या पोस्टरला काळे!

तत्पूर्वी, मराठा आंदोलकांनी काल दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली होती. यासोबतच त्यांनी प्रकाश सोळंके यांच्या गाड्यांची तोडफोड करून त्यांना आग लावली होती. या आगीचे लोट त्यांच्या घरात पसरले होते. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. दरम्यान, ही घटना घडली तेंव्हा आमदार प्रकाश सोळंके हे त्यांच्या घरीच होते. सुदैवाने या आगीत कोणाला दुखापत झाली नाही. मात्र, या आगीच्या घटनेमुळे त्यांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान, मुख्यमंत्री आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकर्त्यांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.

One Comment on “बीडमध्ये आणखी 2 नेत्यांच्या बंगल्यांना आग”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *