बारामती, 21 ऑक्टोबरः संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत बारामती तालुक्यातील तब्बल 6 हजार 641 लाभार्थ्यांचे जुलै ते ऑक्टोबर 2022 या चार महिन्यांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तब्बल 2 कोटी 18 लाख 6 हजार 400 रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे, अशी माहिती तहसिलदार विजय पाटील यांनी दिली आहे.
बानपच्या सार्वजनिक शौचालयाची तोडफोड
संजय गांधी निराधार योजनेतील सर्वसाधारण प्रवर्गातील 2 हजार 834 लाभार्थ्यांचे 96 लाख 96 हजार 400, त्याच योजनेतील अनुसुचित जाती प्रवर्गातील 579 लाभार्थ्यांचे 20 लाख 7 हजार 900, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील सर्वसाधारण प्रवर्गातील 2 हजार 644 लाभार्थ्यांचे 84 लाख 15 हजार 400 व त्याच योजनेतील अनुसूचित जाती प्रर्वर्गातील 584 लाभार्थ्यांचे 16 लाख 86 हजार 700 असे एकूण 2 कोटी 18 लाख 6 हजार 400 रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. त्यामुळे आता निराधारांची दिवाळी गोड होणार आहे.
सुप्रिया सुळेंचा ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल!
ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही उत्पन्नाचा दाखला जमा केला नाही, त्यांनी लवकरात लवकर दाखला जमा करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.
One Comment on “लाभार्थ्यांना तब्बल 2 कोटी 18 लाखांचे अनुदान वाटप”