बारामती, 5 ऑगस्टः बारामतीत एका भरधाव हायवाने तब्बल 18 मेंढ्यांना चिरडले आहे. तर 15 ते 20 मेंढ्या जखमी अवस्थेत आहे. हा अपघात इतका भयानक होता की मृत मेंढ्यांच्या पोटातील गर्भाही चिरडले गेले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय गुणवत्तेची रितिका ठरली मानकरी
सदर अपघात हा बारामती शहरातील इंदापूर रस्त्याकडून माळावरची देवीकडे जाणाऱ्या रिंगरोडवर झाला आहे. अपघात होताच बघ्याची गर्दी जमली होती. या अपघात मेंढ पाळाचे तब्बल 2 ते 3 लाखांचे नुकसान झाले आहे. सदर अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हायवा चालकाला ताब्यात घेतले आहे. तसेच या बाबतचा पुढील तपास पोलीस करत आहे.