संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा योजनेसाठी 1700 कोटींचा निधी

मुंबई, 10 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या दोन्ही योजनांसाठी 1700 कोटी रुपयांचा निधी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना वितरीत करण्यात आला आहे. हा निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून वितरीत केला गेला आहे. तसेच या निधीची रक्कम योजनेतील लाभार्थ्यांना तात्काळ देण्यात यावी, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवा या योजनेतील लाभार्थ्यांना ही रक्कम लवकरच मिळणार आहे.

मुर्टी गावात दिवाळीनिमित्त परिवर्तन व्याख्यानमालेचे आयोजन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून संजय गांधी निराधार अनुदान या योजनेतील लाभार्थ्यांसाठी 600 कोटी रुपये, तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या योजनेसाठी 1100 कोटी रुपयांचा निधी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना वितरीत करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांना ही रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मिळणार आहे.

दरम्यान संजय गांधी निराधार अनुदान या योजनेतंर्गत किमान 18 ते 65 वयोगटातील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांग नागरिकांना या योजनेचा लाभ मिळतो. याशिवाय, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित आणि वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी यांनाही या योजनेचा लाभ मिळतो. तसेच क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यांच्यासारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनाही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याना दरमहा 1500 रुपये मिळतात. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे दारिद्रयरेषेखालील यादीत नाव असणे आवश्यक आहे किंवा संबंधित व्यक्तीचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 21 हजार रुपयांपर्यंत असणे गरजेचे आहे.

राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार

या सोबतच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या योजनेतंर्गत 65 व 65 वरील वर्षावरील लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे दारिद्रयरेषेखालील यादीत नाव असावे आणि कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 21 हजार रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे.

One Comment on “संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा योजनेसाठी 1700 कोटींचा निधी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *