दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी 15 जणांना अटक; लाखोंची रोकड जप्त

नाशिक पोलिसांनी 8 बांगलादेशी घुसखोरांना अटक केली

पुणे, 09 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रीय तपास संस्थेने आज पहाटे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये एकाचवेळी धाडी टाकून ISIS या दहशतवादी संघटनेच्या 15 जणांना अटक केली होती. यासंदर्भात एनआयएने अधिकृत माहिती दिली आहे. एनआयएच्या पथकांनी यावेळी महाराष्ट्रातील पडघा-बोरिवली, ठाणे, मीरा रोड आणि पुणे तसेच कर्नाटकातील बेंगळुरू येथे तब्बल 44 ठिकाणी धाड टाकली. त्यावेळी त्यांनी दहशतवादी हल्ल्याचा कट रचणे आणि दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल 15 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत त्यांच्याकडून बेहिशेबी रोकड, बंदुक, धारदार शस्त्रे, गुन्ह्याची कागदपत्रे, स्मार्टफोन आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आल्याची माहिती एनआयएने दिली आहे.

https://twitter.com/ANI/status/1733510923640582648?s=19

जप्त करण्यात आलेल्यांमध्ये एक पिस्तूल, दोन एअर गन, आठ तलवारी आणि चाकू, दोन लॅपटॉप, सहा हार्ड डिस्क, तीन सीडी, 38 मोबाईल फोन, 10 मॅगझिन बुक्स, 68 लाख 03 हजार 800 रुपये रोख आणि 51 झेंडे यांचा समावेश आहे. दरम्यान, हे आरोपी ISIS मॉड्यूलचे सदस्य असून ते पडघा-बोरिवली येथून कार्यरत असल्याची माहिती एनआयएच्या तपासात उघडकीस आली आहे.



तसेच या आरोपींनी भारतात दहशत आणि हिंसाचार पसरवण्याचा कट रचला होता. तसेच या आरोपींनी हिंसक जिहाद, खिलाफत इत्यादी मार्गाचा अवलंब करून देशातील शांतता आणि सांप्रदायिक सलोखा बिघडवण्याचे काम केले आहे. तसेच ISIS या दहशतवादी संघटनेच्या आरोपींनी भारत सरकार विरुद्ध युद्ध पुकारण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, अशी माहिती एनआयएने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *