पुणे, 20 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात एकूण 303 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. या निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक दिग्गज उमेदवारांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये अजित पवार, हर्षवर्धन पाटील, चंद्रकांत पाटील, विजय शिवतारे, हेमंत रासने, सुनील टिंगरे यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात अनेक चुरशीच्या लढती पहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील आज (दि.20) सकाळी 11 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.
https://x.com/Info_Pune/status/1859117021507842135?t=2fRDftfo2mcTeOJ2agIO9Q&s=19
हडपसर आणि पिंपरीत सर्वात कमी मतदान
पुणे जिल्ह्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 15.64 टक्के इतके मतदान झाले आहे. यामध्ये जिल्ह्यातील बारामती मतदारसंघात सर्वाधिक 18.81 टक्के इतके मतदान झाले आहे. तर सर्वात कमी मतदान हडपसर आणि पिंपरी मतदारसंघात झाले आहे. या दोन्ही मतदारसंघात 11.46 इतके मतदान झाले आहे. याची माहिती पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी (सकाळी 11 वाजेपर्यंत)
1) जुन्नर – 18.61 टक्के
2) आंबेगाव – 16.69 टक्के
3) खेड-आळंदी – 16.40 टक्के
4) शिरूर – 14.44 टक्के
5) दौंड – 17.23 टक्के
6) इंदापूर – 16.20 टक्के
7) बारामती – 18.81 टक्के
8) पुरंदर – 14.44 टक्के
9) भोर – 12.80 टक्के
10) मावळ – 17.92 टक्के
11) चिंचवड – 16.97 टक्के
12) पिंपरी – 11.46 टक्के
13) भोसरी – 16.83 टक्के
14) वडगाव शेरी – 15.48 टक्के
15) शिवाजीनगर – 13.21 टक्के
16) कोथरूड – 16.05 टक्के
17) खडकवासला – 17.05 टक्के
18) पर्वती – 15.91 टक्के
19) हडपसर – 11.46 टक्के
20) पुणे कॅन्टोनमेंट – 14.12 टक्के
21) कसबा पेठ – 18.33 टक्के