मुंबई, 10 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. राज ठाकरे यांना 2010 च्या निवडणुकीवेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत तडीपारची नोटीस बजावली गेली होती. राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने 1951 च्या लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत ही नोटीस बजावण्यात आली होती. मात्र राज ठाकरेंनी ही नोटीस स्वीकारली नव्हती. त्यामुळे तेंव्हा राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तर हा गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी राज ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने राज ठाकरे यांच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंसाठी हा मोठा दिलासा आहे.
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा योजनेसाठी 1700 कोटींचा निधी
तत्पूर्वी 2010 च्या महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत तडीपारची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यावेळी ही नोटीस घेण्यास राज ठाकरेंनी नकार दर्शवला. तसेच राज ठाकरे हे तेंव्हा तडीपार केलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतून गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे राज ठाकरे यांच्या विरोधात पोलिसांनी कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार
याप्रकरणाचा तपास पुर्ण झाल्यानंतर पोलिसांनी 2011 मध्ये कल्याणच्या न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले. याबाबतच्या सुनावणीला राज ठाकरे हे कोर्टात हजर झाले होते. त्यावेळी कोर्टाने राज ठाकरेंना जामीन मंजूर केला होता. तर आज मुंबई हायकोर्टाने राज ठाकरे यांच्यावरील हा गुन्हा रद्द केला आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे राज ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे.
One Comment on “राज ठाकरेंवरील 13 वर्षांपूर्वीचा गुन्हा रद्द”