दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

पुणे, 01 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, इयत्ता बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून होणार आहे. तर इयत्ता दहावीची परीक्षा 1 मार्च पासून घेण्यात येणार आहे. ही परीक्षा 9 विभागीय मंडळांच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. यामध्ये मुंबई, नागपूर, पुणे, कोल्हापूर, अमरावती, कोकण, नाशिक, लातूर, संभाजीनगर या विभागांचा समावेश आहे.

पाणी पिणे सोडणार, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

याबाबतचे वेळापत्रक विद्यार्थ्यांना गुरुवारपासून (दि.02) शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहता येणार आहे. याची माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे. या वेळापत्रकानुसार, इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. तर इयत्ता दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या दरम्यान घेतली जाणार आहे. तसेच इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 2 ते 20 फेब्रुवारी 2024 या काळात, तर इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 10 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत होणार आहे.

जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावे, सर्वपक्षीय नेत्यांचे आवाहन

यावेळी राज्य शिक्षण मंडळाने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, “मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा /उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सॲप किंवा तत्सम माध्यमातून प्रसिध्द झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. उपरोक्त बाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.” त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी करण्याची आवश्यकता आहे.

One Comment on “दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *