इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत छत्रपती शिवाजी विद्यालयाचा 100 टक्के निकाल

बारामती, 24 जानेवारीः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) शासकीय इंटरमिजीएट आणि एलिमेंटरी ग्रेड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत बारामती तालुक्यातील मुर्टी गावातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला आहे.

बारामतीत विवाहितेला लाकडी दांडक्याने मारहाण

या स्पर्धेत शाळेतील तब्बल 59 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक डी.जी. काकडे सरांनी दिली आहे. या इंटरमिजीएट परीक्षेला 21 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 1 विद्यार्थी अ श्रेणीत, 14 विद्यार्थी ब श्रेणीत, तर 6 विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यासह एलिमेंटरी परीक्षेत 37 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 1 विद्यार्थी अ श्रेणीत, 10 विद्यार्थी ब श्रेणीत, 26 विद्यार्थी क श्रेणीत घवघवीत यश संपादन केले आहे.

महसूल खात्याच्या हलगर्जीपणामुळे बारामतीतील नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास

या यशस्वी विद्यार्थ्यांचे कला विभाग प्रमुख मेघा ठोंबरे मॅडम, गणित शिक्षक राहुल खोपे सर, माधव जोशी सर, संजय भामे सर, एस. जी. लडकत सर, सारिका तांबे मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.

One Comment on “इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत छत्रपती शिवाजी विद्यालयाचा 100 टक्के निकाल”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *