गहाळ झालेले 100 मोबाईल लोकांना परत केले, सायबर पोलिसांची कामगिरी

मुंबई, 31 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील अनेक नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यांतील गहाळ झालेल्या 100 मोबाईलचा शोध मुंबईतील गावदेवी व मलबार हिल पोलीस ठाण्यातील सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने घेतला आहे. हे सर्व मोबाईल पोलिसांनी तक्रारदारांना परत केले आहेत. याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. यावेळी या व्यक्तींनी पोलिसांचे आभार मानले.

https://twitter.com/MumbaiPolice/status/1752555996504072537?s=19

या सर्व मोबाईलची किंमत 15 लाखांच्या घरात

गावदेवी व मलबार हिल पोलीस ठाण्यांचे सायबर गुन्हे प्रकटीकरण अधिकारी आणि पथकांनी पोलीस ठाण्याच्या हद्दींतून गहाळ झालेल्या 100 मोबाईल शोध घेतला आहे. या सर्व मोबाईलची एकूण किंमत अंदाजे 15 लाखांच्या घरात आहे. ते सर्व मोबाईल पोलिसांनी तक्रारदारांच्या स्वाधीन केले आहेत. यासंदर्भात नागपाडा येथील अपर पोलीस आयुक्त, द. प्रा. वि. यांचे कार्यालय येथे मा. अपर पोलीस आयुक्त श्री. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाअंतर्गत तक्रारदारांना हे मोबाईल परत करण्यात आले आहेत. यावेळी मा. पोलीस उप-आयुक्त प्रविण मुंढे हे देखील उपस्थित होते.

दरम्यान, अनेकदा लोकांचे मोबाईल गहाळ होत असतात. हे गहाळ झालेले मोबाईलचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांवर असते. अनेकदा या गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध लागत नाही. आपला मोबाईल लवकर सापडावा यासाठी मोबाईल चोरी किंवा गहाळ झाल्यावर सर्वप्रथम संबधित पोलीस ठाण्यात तक्रार देणे आवश्यक असते. त्यामुळे लोकांनी यासंदर्भात लवकरात लवकर तक्रार करावी, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *