अग्निवीर अक्षयच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत

बुलढाणा, 26 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) सियाचीन येथे कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.26) अक्षय गवते यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करुन दिली आहे.

सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड, मराठा क्रांतीचे तिघेजण ताब्यात

“सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. जवान अक्षय गवते हे चिखली तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील राहणारे होते. महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला वीरमरण आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्षय यांच्या निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली”, असे मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट मध्ये म्हटले आहे.

ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन

तत्पूर्वी, अग्निवीर अक्षय गवते हे बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील रहिवासी होते. ते सियाचीनमधील ग्लेशियरमध्ये कर्तव्यावर होते. त्यांची काराकोरम पर्वतरांगातील सुमारे 20,000 फूट उंचीवर असलेल्या सियाचीन ग्लेशियरवर नियुक्ती करण्यात आली होती. या ठिकाणाला जगातील सर्वात उंच रणांगण म्हणून ओळखले जाते. तिथे सैनिकांना जोरदार थंडी आणि वाऱ्याचा सामना करावा लागतो. याच उंच हिमाच्छादित क्षेत्रात कर्तव्य बजावत असताना अक्षय गवते यांचे 20 ऑक्टोंबर रोजी निधन झाले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर 23 ऑक्टोंबर रोजी मूळ गावी पिंपळगाव सराई येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी अक्षय गवते यांना अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक जमले होते.

One Comment on “अग्निवीर अक्षयच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *