‘हे’ आहेत उसाचा रस पिण्याचे गुणकारी फायदे

उन्हाळ्यात उसाचा रस पिणे हे शरीरासाठी खूप चांगले असते. उसाचा रस हे नैसर्गिक पेय असून ते गर्मीपासून बचाव तर करतेच तसेच अनेक आजारापासूनही दूर ठेवते. उसाच्या रसापासून शरीराला भरपूर ऊर्जा मिळते.

  • उसाचा रस प्यायल्याने त्वचा उत्तम राहते. उसाचा रस प्यायल्याने पिंपल्स, चेहऱ्यावरचे डाग दूर होतात. तसेच स्किनला हायड्रेटेड राहण्यास मोठी मदत होते.
  • उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा धोका उद्भवतो. त्यामुळे उसाचा रस प्यायल्याने डिहायड्रेशन पासून बचाव होतो.
  • उसाचा रस हा ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. यात ग्लूकोजची अधिक मात्रा असल्याने हे एक उत्तम एनर्जी ड्रिंक आहे. यामुळे फक्त ऊर्जाच मिळत नाही तर उन्हापासून बचाव करुन शरीराला शांत ठेवण्यास देखील मदत होते.
  • उसाचा रस खोकला, दमा, मुत्ररोग आणि किडनीशी संबधित रोगांवरदेखील गुणकारी आहे.
  • उसाचा रस कावीळ या रोगांवर अत्यंत गुणकारी आहे. कावीळ होऊ नये म्हणून नेहमी उसाचा रस पिणे फायदेशीर आहे.
  • कावीळ झाल्यास उसाचा रस किंवा रोज सकाळी उस खाल्यास लवकर कावीळ बरी होण्यास मदत होते.
  • उसाचा रस प्यायल्याने तोंडातील दुर्गंधीपासून मुक्ती मिळते. तसेच बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध होतो. यामुळे दातांना होणाऱ्या इनफेक्शनपासून बचाव तर होतोच तसेच निरोगी ठेवण्यासही मदत होते.
  • उसाचा रस हा नैसर्गिक असल्यामुळे लहांनांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वजण पिऊ शकतात. फक्त १-४ वर्षापर्यंतच्या बालकांनी मात्र उसाचा रस थोड्या प्रमाणात घ्यावा.
  • कृत्रिम थंड पेय शरीराला तात्पुरता थंडावा देतात खरी पण याचे दुष्परिणाम खूप आहेत. याउलट उसाच्या रसाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
  • उसाचा रस नाशवंत असल्यामुळे तो पिण्याआधी ताजा असणे फार महत्त्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *