श्रीपाल नागरी पत संस्थेचा नियमबाह्य कर्ज पुरवठा

बारामती, 24 मार्चः शहरातील श्री राम गल्ली येथील श्रीपाल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, ही पतसंस्था आहे. ही पतसंस्था नामांकीत डॉक्टरांची असून त्यांचे नाव संपूर्ण पुणे जिल्ह्यात नावलौकिक आहे. या पतसंस्थेत एका कर्ज प्रकरणात हेराफेरी झाल्याची बाब ‘भारतीय नायक’चे पत्रकार अभिजीत कांबळे यांनी प्रकाशात आणली आहे.

दरम्यान, एका कर्ज वाटप प्रकरणात कागदपत्राची त्रुटी असूनही नितीन विठ्ठल निकम या कर्जदाराला 10 लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे कर्ज वाटप करताना अनेक नियम धाब्यावर ठेवल्याचे अभिजीत कांबळे यांनी सांगितले. नितीन विठ्ठल निकम यांना 10 मार्च 2021 रोजी व्यवसाय वृद्धीसाठी कर्जपुरवठा करण्यात आला. मात्र कर्ज देताना कर्ज अर्जावर मंजुरी म्हणून चेअरमन आणि सचिव यांची स्वाक्षरी नाही. तसेच जामीनदाराचा फोटो घेण्यात आलेला नाही. कर्जदार नितीन निकम यांचा उत्पन्नाचा पुरावा हा तहसील कार्यालयकडून प्रमाणित केलेला असून त्यावर त्यांचे वार्षिक उत्पन्न  92,000 रुपये इतकेच दाखवण्यात आलेले आहे. त्यामुळे कर्जफेडीचा विचार न करता कर्जदाराचे उत्पन्न पुरेसे वाटत नाही.

सदर कर्ज हे व्यवसाय वृद्धीसाठी देण्यात आलेले आहे, मात्र या कामी कोणतेही कागदपत्र घेतलेले नाही. कर्जफेडसाठी कोणतीही शहानिशा केलेली नाही. यासह व्यवसायाबाबत कोणतेही माहिती संस्थेकडे उपलब्ध नाही. कर्जफेड बाबत हेमराज विठ्ठल निकम यांच्या हमीपत्र घेण्यात आलेल्या आहे. परंतु संस्थेचे त्यांना सह कर्जदार करून घेतलेले नाही. तारण मालमत्ता बोजा नोंद अध्यावत उतारा दप्तरी घेण्यात आलेला नाही. यातून आर्थिक हितसंबंध पोटी असे अनेक कर्ज दिली असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे अशा संस्थांवर कारवाई करण्यासाठी न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचे अभिजीत कांबळे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *