बारामती, 29 मार्चः बारामती शहर हे शिक्षण क्षेत्रात झपाट्याने प्रगती करणारे शहर म्हणून उदयास येत आहे. या शहरात अनेक शिक्षण संस्था कार्यरत आहेत. काही जुन्या आहेत, तर काही नव्याने उदयास येत आहे. या शिक्षण क्षेत्रात नामवंत शाळांपैकी एक शाळा म्हणजे विद्याप्रतिष्ठान विनोद कुमार गुजर बालविकास मंदिर (इंग्लिस मीडियम) हे एक नाव आहे. सध्या या शाळेत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा आज, मंगळवार 29 मार्च 2022 पासून सुरु झाल्या आहेत. शांततेत चाललेल्या परीक्षांदरम्यान अचानक मोठा गोंधळ उडला. यामुळे शाळेत एकच गोंगाटा झाला.
विनोदकुमार गुजर बालविकास मंदिर शाळेत आज, एसएससीई आणि आयसीएसई या दोन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांचे पेपर सुरु होते. मात्र सकाळच्या सत्रात वानरांच्या टोळीने शाळेत घुसुन हौदोस घातला. यामुळे काही काळ शाळेत मोठा गोंधळ उडाला. या शाळेत वानर घुसल्याने शाळा प्रशासनाला काय करावे, हे सुचलेच नाही. एक- दोन वानरांनी वर्गातही प्रवेश केला. मात्र कोणत्याही विद्यार्थ्याला जखमी केलं, अशी माहिती मिळालेली नाही. सध्या सर्व विद्यार्थी सुरक्षित असून आपापल्या घरी सुखरुप पोहोचले आहेत. मात्र मोठ्या उत्साहाने शाळेत घडलेला प्रकार ते त्यांच्या पालकांना सांगत आहे.
उन्हाळा म्हटलं की, वन्य प्राण्याची खाण्या पिण्यासाठी भटकंती सुरु होते. अन्नाच्या आणि पाण्याच्या शोधात अनेक वेळा वन्य प्राणी हे मानवी वस्तीकडे धाव घेत असतात. असाच प्रकार आज झालेल्या शाळेतील प्रकारावरून दिसुन येत असल्याचे मत प्राणीमित्रांकडून सांगण्यात येत आहे.