बारामती, 23 मार्चः शहरातील शारदा प्रांगण येथील राष्ट्रवादी भवन येथे 21 मार्च रोजी वाढदिवसानिमित्त सायकलींचे वाटप करण्यात आले. हे वाटप युगेंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधून करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक युगेंद्र दादा पवार युवा मंच महाराष्ट्र राज्य यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य रितेश गायकवाड, भुषण जाधव यांनी केले. तसेच त्यांच्या बरोबरचे सहकार्य सुधाकर माने वस्ताद, ताठिया साहेब, महेश गायकवाड, महेंद्र सर गायकवाड, आरती शेंडगे, दादासाहेब जावळे, अनिता गायकवाड (महिला शहर अध्यक्ष), अमोल पवार सर, प्रदिप सर, लव्हे आदींचे सहकार्य लाभले.