मुंबई, 25 मार्चः मुंबई हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यक्षेत्र होते. मुंबई डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक आंदोलने केली आहेत. मुंबईतच त्यांनी कामगारांसंदर्भातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली. मुंबईतील मोठ्या प्रमाणात कामगार हे लोकलच्या माध्यमातून कामावर दररोज ये- जा करतात. यामुळे मुंबई सेंट्रल रेल्वेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संसदेत केली.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास यांनी त्यांच्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल मोठा आदर असल्याचेही म्हटले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव विटी स्टेशन तसेच आंतर राष्ट्रीय विमान तळाला असल्याचं सांगितलं. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मुंबई सेंट्रलला द्यावं, अशी मागणी केली. तसेच महाराष्ट्रात नवीन रेल्वे सुरु करव्यात. तसेच रेल्वे लाईन लगत असलेल्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करावे याचीही मागणी केली. यासह महाराष्ट्रासाठी विकासासाठी निधी देण्याची मागणीही त्यांनी त्यांच्या भाषणेवेळी केली.