बारामती, 24 मार्चः बारामती तालुक्यातून गेलेला राज्य शासनाचा संत तुकाराम महाराज पालकी महामार्ग अनेक दिवसांपासून चर्चेचा आहे. राज्य शासनाकडून या महामार्गावर जलद गतीने काम करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज, गुरुवार इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील रस्त्याशेजारील असणाऱ्या अतिक्रमणावर मोठ्या प्रमाणात हातोडा चालवण्याचे काम सुरु आहे. या कामासाठी सकाळ पासूनच पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण पाडण्याचे काम करण्यात येत आहे. दरम्यान, सकाळ पासूनच कारवाई पाहताना स्थानिकांची मोठी गर्दी दिसत आहे.
बारामती तालुक्यातून राज्य सरकारचा महत्त्वाच्या प्रकल्पापैकी एक संत तुकाराम महाराज पालकी महामार्गाचे काम जलद गतीने होत आहे. दरम्यानच्या काळात भूअधिग्रहण नियमानुसार स्थानिकांच्या जमीन अधिग्रहणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर दुसरीकडे ज्यांचे अधिग्रहण झाले आहेत, त्यावर महामार्गाचे काम जलद गतीने सुरु आहे. तसेच महामार्गाच्या दुतर्फा असणारे अतिक्रमण पाडण्याचे काम टप्प्या टप्प्याने चालू आहे. याचाच एक भाग म्हणून लासुर्णे येथून गेलेल्या महामार्गाच्या दुतर्फा असणाऱ्या अतिक्रमण पाडण्याचे काम सध्या सुरु आहे.