बारामती, 13 एप्रिलः बारामती तालुक्यातील कऱ्हा वागज येथील मुकबधिर निवासी शाळेत सोमवार,11 एप्रिल 2022 रोजी महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती साजरी केली. या जयंतीनिमित्त बारामती सर्वधर्म समभाव समितीने तेथील विद्यार्थ्यांना फळे वाटून स्तुत्य उपक्रम राबवला.
जयंतीनिमित्त वायपट खर्च करुन धांगड धिंगाणा घालण्यापेक्षा अशा मुलांना किंवा गोरगरीब जनतेला मदत करुन आपण सर्व महामानवांची जयंती साजरी करू शकतो, असे सर्वधर्म समभाव समीतीचे संस्थापक अध्यक्ष प्रतीक (शेट) जोजोरे यांनी यावेळी सांगितले.
हा कार्यक्रम योग्य रीतीने पार पाडण्यासाठी चैतन्य गालिंदे यांनी पुढाकार घेतला. तसेच सर्वधर्म समभाव समितीचे मोहिन शेख, सूरज ओवाळ, करीम तंबोळी, योगेश महाडिक, गणेश गलिंदे, पवन गालिंदे तसेच समितिचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .