बारामती पंचायत समितीत रंगला जुगारीचा डाव

बारामती, 4 एप्रिलः  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात बारामती शहरात सध्या अनेक विकास कामे सुरु आहेत. नुकताच शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या बारामती पंचायत समितीची इमारतीचे उद्घाटन सोहळा थाटात पार पडला. तालुक्यातील नागरीकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ व्हावा, त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, या हेतूने पंचायत समितीची नवीन इमारत उभारण्यात आली. मात्र या इमारतीचा उपयोग वेगळ्याच कारणाने होत असल्याचे समोर आले आहे.

नवीन पंचायत कार्यलयातच पंचायत समितीचे कर्मचारी जुगारीचा डाव खेळत असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे तालुक्यातील नागरीकांचे अनेक कामे रखडली आहेत. ही कामे त्वरीत व्हावी, आपली अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी तालुक्यातून नागरीक नूतन पंचायत समितीत ये जा करताहेत. मात्र या घटनेमुळे पंचायत समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सदर प्रकरणात वरीष्ठ अधिकारी लक्ष घालून कोणती कारवाई करतील, हे येणाऱ्या काळात समोर येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *