बारामती, 22 मार्चः बारामती शहरात आज, मंगळवारी रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील चौका-चौकात, गल्ली बोळात रंगाची उधळण पाहण्यात आली. तसेच या रंगात लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी आनंद लुटला. रंगपंचमी दिवशी यंदा युवकांनी अत्यंत उत्साहात परंतु सामाजिक, पर्यावरणाच भान राखत कोरड्या, नैसर्गिक रंगाची उधळण करीत साजरा करण्यात आला.
नेहमीप्रमाणे यंदा रंगाने भरलेले टिप, पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासडी खूप कमी प्रमाणात दिसून आली. तसेच तुरळक ठिकाणी वाद्य वाजवले, मात्र डॉल्बीचा गोंगाट कुठेही दिसला नाही. रंग खेळणाऱ्यांच्या गटातील लोकांची संख्याही यावेळी कमी दिसून आली. यासह अपार्टमेंटची पार्किंग, घरासमोर अंगण, गल्लीतील रस्त्यांवर, मोकळ्या जागेत, पाण्याच्या ठिकाणी रंग खेळण्यात आले. चौका-चौकांत दिसून येणारे समुह यंदा कमी दिसत होते. असेच काही लहान मुले रंग खेळताना आनंदात दिसत आहे.