बारामती, 31 मार्चः गोवा येथे पार पडलेल्या ‘व्हीनस मिस इंडिया 2022’ चा किताब बारामतीची सुकन्या श्रुती राजीव कांबळे हिने पटकवला आहे. या गगनभरारी यशाबद्दल श्रुतीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. ज्यावेळी श्रुती कांबळे हिचे बारातमी आगमन झाल्यानंतर तिचे जंगी मिरवणुक काढण्यात आली. या शोभा यात्रेत श्रुतीचे स्थानिकांनी भरभरून कौतुक केले.
दरम्यान, गोवा येथील ज्युबिलिएट आऊटडोर स्टुडिओमध्ये 27 मार्च रोजी व्हीनस फिल्म अँड इव्हेंट्सतर्फे व्हीनस मिस इंडिया 2022 चा ग्रेंड फिनालेचा कार्यक्रम पार पडला. या स्पर्धेत जज म्हणून फर्स्ट इंडिया चॅनलचे सीएमडी जे. सी. कातिल हे प्रमुख पाहुणे होते. तसेच ज्युरी पॅनल म्हणून मिस राजस्थान 2020 ची विजेता खुशी अजवानी यांची उपस्थिती होती. या स्पर्धेत मिस कॅटेगरीत देशभरातून 20 हून अधिक मॉडेल्सनी सहभाग घेतल्याचे स्पर्धेचे डायरेक्टर जे जे कश्यप यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील मुलीही ठरवलं तर अशक्यही शक्य करू शकतात, हे श्रुतीच्या यशानंतर खरं ठरलं आहे. श्रुती हिचा या स्पर्धेपर्यंत खूपच खडतर प्रवास राहिला आहे. श्रुती ही सामान्य कुटुंबातून आले असून तिचे आई-वडील कामगार वर्गात मोडता. श्रुतीच्या यशानंतर माझ्या कष्टाचं फळ मिळालं, अशी प्रतिक्रिया तिच्या आई-वडिलांनी दिली.