बारामती, 17 एप्रिलः बारामतीचा विकास वेगाने होत आहे. बारामती शहरासह तालुक्यात औद्योगिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये वेगावा विकासाचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वात बारामती शहरासह तालुक्याचा पायाभूत सुविधांचा विकास हा राज्यात नव्हे तर देशात उल्लेखनीय आहे.
बारामतीमधील शिवसृष्टी, निरा कालव्याचे सुशोभीकरण, टोलेजंग प्रशासकीय इमारती, अंतर्गत रस्ते, बाह्य रस्ते, पाणी साठवण तलाव या मूलभूत सुविधा आदर्श वृत्त आहेत. बारामतीच्या सामाजिक राजकीय क्षेत्रात बारामतीही राज्यातच नव्हे तर देशात अव्वल म्हंटले तर हे वावगं ठरणार नाही. विकास कामाचा दर्जाबद्दल बोलायचे झाले तर आलेल्यांनी निधीचा प्रशासक कुचकामी ठरले आहे.
बारामतीमध्ये कऱ्हा नदी पात्र आहे. या पात्राच्या कामात हलगर्जीपणा केल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांची तक्रार आहे. सदर कामात निकृष्ट दर्जाचा दगड वापरला आहे. या कामात कमीत कमी 20 किलो ते जास्तीत जास्त 50 किलो वजनाचे दगड वापरायचे अंदाज पत्रकात आहे. परंतु अगदी 1, 2, 3, 5 आणि 10 ते 15 किलो पर्यंतच दगडांचा वापर कामाच्या पाहणी केल्यास दिसून येत आहे. त्यामुळे हे काम पावसाळ्यात आणि पुरात किती टिकेल, यात जाणकारांकडून शंका उपस्थितीत केली जात आहे.
या कामाची पाहणी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ पुणे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग पुणे आणि उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग बारामती या अधिकाऱ्यांच्या देखरेखी काली काम चालू आहे. बारामती नगर परिषद हद्दीतील कऱ्हा नदी सुधार प्रकल्प स्ट्रक्चर बांधकाम प्रशासकीय मान्यता रक्कम 18 कोटी 70 लाख आहे.