बारामतीकरांसाठी मोठी खुशखबर

बारामती, 2 एप्रिलः रेल्वे प्रशासनाकडून बारामतीकरांसाठी गुढीपाडव्याच्या दिवशी मोठी खुशखबर दिली आहे. पुणे-दौंड-बारामतीची रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. याचा फायदा चाकरमानी आणि इतर प्रवाशांना होणार आहे. बारामतीची रेल्वे सेवा 11 एप्रिल पासून सुरु करणार असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. रेल्वेच्या या निर्णयाचे स्वागत सर्व स्तरातून होत आहे.

दौंड रेल्वे स्टेशनवरून रेल्व क्र. 1523 ही गाडी सकाळी 5.45 वाजता निघेल आणि सकाळी 7 वाजता बारामती रेल्वे स्टेशनला येईल. तसेच रेल्वे क्र.1526 बारामती स्टेशनवरून 7.10 वाजता निघेल आणि दौंडला सकाळी 8.20 वाजता पोहोचेल. दौंडवरून सकाळी 8.25 वाजता दौंडवरून निघेल आणि सकाळी 10.05 पुण्याला पोहोचेल.

रेल्वे क्र.1532 ही बारामतीवरून रात्री 10.25 वाजता निघेल आणि दौंड येथे रात्री 11.30 वाजता पोहोचेल. या रेल्वे 11 एप्रिलपासून सुरु होतील. यापुर्वी सुरु असलेल्या सेवाही सुरु राहतील. रेल्वे क्र. 1525 सकाळी 9.40 वाजता पुण्याहून निघेल आणि दौंड येथे सकाळी 11.10 वाजता पोहोचेल. रेल्वे क्र.1527 ही दुपारी 2.55 वाजता दौंडवरून निघेल आणि ही रेल्वे दुपारी 4.10 वाजता बारामती स्टेशनला पोहोचेल. रेल्वे क्र.1528 ही गाडी बारामतीहून 4.50 वाजता निघेल आणि ती रात्री 7.45 वाजता पुण्याला पोहोचेल. रेल्वे क्र.1530 ही गाडी संध्याकाळी 6.45 वाजता निघेल आणि रात्री 9.35 वाजता बारामती स्टेशनला पोहोचेल.

दरम्यानच्या काळात या गाड्या सुरु होत्या, मात्र कोरोना काळात त्या बंद झाल्या होत्या. आता कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आल्याने या रेल्वे गाड्या पुन्हा सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *