बाईक घेण्यासाठी दिले 2.60 लाखांची नाणी

सालेम, 28 मार्चः स्वतःला बाईक हवी, हे कोणाला वाट नाही. मात्र ही स्तुप्त इच्छा इतरांसाठी डोकेदुखी ठरू शकते. असाच वाईट अनुभव एका तरूणाच्या बाईक घेण्याच्या स्तुप्त इच्छेमुळे बाईक शो- रूमच्या कर्मचाऱ्यांना आला आहे. या पट्ट्याने सरळ शो-रूमला जात कॅशमध्येच स्पोर्ट बाईक विकत घेतली. यामुळे त्याचा आनंद गगनाला मावेना. मात्र या आनंदामुळे शो-रूमवाल्याची चांगलीच डोकेदुखी वाढवली.

यामागचे कारणही तसेच आहे.  तामिळनाडू राज्यातील सालेम येथील एका तरूणाने बाईक घेण्यासाठी तब्बल 2 लाख 60 हजार रुपये रोख मोजले आहे. मात्र त्या तरूणाने हे पैसे नोटांच्या स्वरुपात दिले नाही. त्याने आपल्या मित्रांसोबत बाईकच्या शो- रूममध्ये जात चक्क 2 लाख 60 हजार रुपयांची 1 रुपयांची नाणी आणली. या तरूणाने मित्रासोबत शो-रूममध्ये बसत सर्व नाणी मोजून देत रोखीचा व्यवहार पूर्ण केला. मात्र या प्रकारामुळे शो-रूममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घामच फुटला.

सध्या या तरूणासह त्याच्या मित्राचे पैसे मोजतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या तरूणाला हे पैसे जमा करण्यासाठी 3 वर्षे लागल्याचे त्याने एएनआयच्या रिपोर्ट्सला माहिती देताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *