फलटणमधील प्रसिद्ध सराफ दुकानात चोरी

फलटण, 9 एप्रिलः फलटण शिंगणापूर रोडवरील पृथ्वी चौकातील सुप्रसिद्ध शांतीकाका सराफ अँड सन्स या दुकानात सुमारे 2 लाख 92 हजार रुपयांचे सोन्याचे गंठण चोरांनी लंपास केल्याची घटना घडली. ही घटना गुढी पाडव्याच्या दिवशी 2 एप्रिल रोजी दुपारी 12.40 च्या सुमार घडली. सदर चोरीची घटना ही सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या बाबतचा पुढील तपास फलटण पोलीस करीत आहे.

या चोरीत तीन चोरांनी (यात एक पुरुष आणि दोन महिला यांचा समावेश आहे) हातसफाईने सोन्याचे गंठण लंपास केले. विशेष म्हणजे त्या दिवशी दुकानात जास्त गर्दी दिसत नाही आणि त्या काऊंटरला दोन महिला कर्मचारी सुद्धा उपस्थित होत्या. मात्र मोठ्या चतुराईने या चोरांनी सोन्याच्या गंठणावर हात साफ केला.

अशीच चोरी बारामतीमधील सुप्रसिद्ध चंदुकाका सराफ अँड सन्स या दुकानात गुडी पाडव्याच्या दिवशी झाली. ही चोरीसुद्धा सीसीटीव्हीत कैद झाली. या चोरीत सुद्धा एक पुरुष आणि दोन महिला चोर चोरी करताना दिसत आहेत. या चोरीत चोरांनी सुमारे 4 लाख रुपयांचा गंठण हात सफाईने लंपास केला.

सदर दोन्ही घटना शेजारील असणाऱ्या शहरात घडल्या असून या दोन्ही चोरींचा कालावधीत सुमारे तासाभराचा फरक दिसत आहे. तसेच या दोन्ही घटनेत एक पुरुष आणि दोन महिला चोर दिसत आहे, विशेष म्हणजे त्यांचा एकसारखा पेहनावा परिधान केल्याचेही दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *