प्रा. शिवाजी कांबळे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

बारामती, 26 मार्चः बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे आर्ट, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयातील प्राध्यापक शिवाजी कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. अमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार नागपूरच्या दीक्षाभूमी येथील ऑडिटोरिएम सभागृहात 27 मार्च 2022  रोजी दुपारी 12 वाजता होणाऱ्या जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या 8 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात देण्यात येणार आहे.

प्रा. शिवाजी कांबळे हे विद्या प्रतिष्ठानचे आर्ट, सायन्स अँड कॉमर्स कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या 19 वर्षांपासून बायोलॉजी हा विषय शिकवतात. त्यांचे वेगवेगळ्या मासिकांतून लिखाण केले आहेत. तसेच दैनिक देशोन्नती, बहुजन नायक मराठवाडा, एकमत साप्ताहिक एकपत्र, आदी. वृत्त पत्रात त्यांचे लिखाण प्रसिध्द झाले आहेत. यासह प्रा. कांबळे यांनी ‘बुद्धआणि त्यांचा धम्म’ यावर अनेक व्याख्याने दिली आहेत. तसेच ‘विद्यार्थी परीक्षेला सामोर जाताना’ यावर व्याख्याने दिली आहेत. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी मार्गदर्शन दिली आहेत. प्रा. शिवाजी कांबळे सरांना हा पुरस्कार जाहीर होताच त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *