पंढरपूर, 10 एप्रिलः पंढरपूर शहरातील विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यासह विठ्ठल चौखांबीला आज, रविवारी, 10 एप्रिल 2022 रोजी सफरचंद आणि फुलांचा आकर्षक आरास करण्यात आली. यामुळे विठ्ठल रूक्मिणी मंदिराचा गाभारा आकर्षक दिसत आहे. हा आरास रामनवमी निमित्त करण्यात आल्याची माहिती विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सांगण्यात आले.
सदर मंदिराच्या गाभाऱ्यास सफरचंद आणि फुलांची आरास ही पुण्यातील भरत यादव यांच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच या आरासचे डेकोरेशन ताम्हाणे, शेरे, नाईक, शितोळे प्लॉवर्स मर्चंट पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. या आरासासाठी 5 हजार नग सफरचंदाचा वापर करण्यात आला आहे. तसेच आरासमध्ये शेवंतीची पांढरी, पिवळ्या आणि दवना फुलांचा वापर करण्यात आला आहे. या आकर्षक आरासाने सर्व भाविकांचे लक्ष वेधले आहे.