नगरपरिषदेकडून पुस्तक बँकेसाठी नागरीकांना आवाहन

बारामती, 8 एप्रिलः बारामती नगर परिषद आणि जय जवान आजी माजी सैनिक संघटना बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तक बँक या अभिनव उपक्रमाचे आयोजन 9 व 10 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 12 वाजता करण्यात येत आहे. ज्यामध्ये आपणाकडील सुस्थितीत असणारी जुनी शालेय पुस्तके आपण जमा करू शकता. तसेच आपणास आवश्यक असणारी पुस्तके घेऊन जाऊ शकता.

आज प्रत्येक घरात कमीत कमी एक विद्यार्थी असतोच. दरवर्षी आपण आपल्या मुलांसाठी नवीन पुस्तके खरेदी करत असतो. मात्र त्या वापरलेल्या पुस्तकांच एकतर ते रद्दीला जातात किंवा घरात अडगळ होऊन राहतात. त्यापेक्षा ती जुनी पुस्तके गरजू विदयार्थ्याना उपयोगी ठरू शकतात.

याच हेतूने बारामती नगरपरिषद आणि जय जवान आजी माजी सैनिक संघटना बारामती यांच्या वतीने शहरातील नागरीकांना पुस्तक बँकेसाठी आवाहन करण्यात येत आहे. याचा लाभ सर्व गरजुंना होईल च त्याचबरोबर पुस्तकांचा पुनर्वापर करून पर्यावरणास मदत सुद्धा होईल. या उपक्रमध्ये सर्व सहभागी व्हा आणि जे नको ते द्या, जे हवे ते घेऊन जा, ही संकल्पना मांडली आहे.

ही पुस्तके तुम्हाला शहरातील शारदा प्रांगण, जय जवान माजी सैनिक संघटना कार्यालय सूर्यनगरी, शाहू हायस्कुल आणि सातव शाळा या ठिकाणी जमा करायचे आहे. तसेच तेथून घेऊन जाऊ शकता. या बाबत अधिक माहितीसाठी संतोष तोडकर (8850732061), रणधीर लोहाट (8010704249), हनुमंत निंबाळकर (7447800391), शिवनींगा माळी (9881687815) या समन्वयक यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *