बारामती, 13 एप्रिलः बारामती शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार होत आहेत. या जयंतीचे औचित्य साधुन सोमवारी, 11 एप्रिल रोजी शहरातील 130 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या साहित्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी दप्तर, वह्यांचा संच, पेन, पेन्सिल, पाटी, कंपास, लंच बॉक्स आदी वस्तूंचा समावेश आहे.
सदर कार्यक्रमाला छत्रपती जन्मोत्सव समिती बारामती, संविधान युवा प्रतिष्ठान, समता परिषद यांचे मोलाची मदत केली. तसेच समिर बनकर, माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक नवनाथ बल्लाळ, उत्तम धोत्रे, पिंटुभाऊ गायकवाड, Dk gruop,केतन गार्डी, ज्ञानेश्वर जगताप, अजित कांबळे, सुमित रेड्डे, इजाज खान, चंद्रकांत बिस्ट, स्वन्नील इंगुले, अजित यादव, अजय नागे, विजय जगताप, आरपीआय बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे यांनी विशेष सहकार्य केले. दया दामोदरे, सिध्दार्थ सोनवणे, चंद्रकांत माने, अभिलाष बनसोडे, भास्कर दामोदरे, अनिकेत मोहिते, विनय दामोदरे, अनिकेत साळवे, मंगलदास निकाळजे, तिरंगा पंडित आदींनी परिश्रम घेतले.