ऐन उन्हाळ्यात बारामतीकरांच्या पाण्याची नासाडी

बारामती, 8 एप्रिलः बारामती शहरात सध्या मुबलक प्रमाणात पाणी साठा आहे. यामुळे पाण्यासाठी बारामतीकरांना वनवन फिरण्याची वेळ सध्या तरी आली नाही. मात्र लवकरच पाण्यासाठी वनवन फिरण्याची वेळ येईल, असे दिसत आहे. बारामती शहरातील मुख्य रस्त्यांपैक एक इंदापूर रस्त्यावर संचिती हॉस्पिटल शेजारी संघवी पार्क जवळ पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली आहे.

या फुटलेल्या पाण्याच्या पाईपलाईनमुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे.  या फुटलेल्या पाईपलाईनमुळे पिण्याचे पाणी रस्त्याच्या कडेला  वाहताना दिसत आहे. या फुटलेल्या पाईपलाईनकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. यामुळे येणाऱ्या काही दिवसात शहरात कुत्रिम पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *