बारामती, 18 एप्रिलः बारामती शहरातील भिगवण रोडवरील ल्युमिनस, टाटा ग्रीन कंपनीच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर पॉवर सिस्टिमच्या ओम एंटरप्राईजेसच्या नवीन शॉपचे उद्घाटन रविवारी, 17 एप्रिल 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. सदर कार्यक्रम हा सनशाईन प्लाझा, भिगवण रोड, डोमिनोज पिझ्झा समोर, बारामती येथे पार पडला.
या कार्यक्रमास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य विश्वास देवकाते, ल्युमिनस कंपनीचे रिजनल सेल्स मॅनेजर विभव भार्गव व टीम, यासह टाटा कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट अनिल भामरे, ओंकार टेन्को, पुणेच्या स्मिता व शिरीष नगरकर, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती भाऊसाहेब कर, बारामती इंडस्ट्रीयल मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनचे धनंजय जामदार, माजी बारामतीच्या नगरसेविका नीलिमा मलगुंडे, माजी फलटणच्या नगरसेविका वैशाली चोरमले आदींसह वकील, डॉक्टर्स, पत्रकार, उद्योजक व्यावसायिक, युवा बंधू- भगिनी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होत. माजी नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांनी ही यावेळी उपस्थिती दर्शवली.
या कार्यक्रम प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे कल्याणी वाघमोडे व महिला भगिनींनी औक्षण करून स्वागत केले. फीत कापून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ओम एंटरप्रायजेस या नवीन व्यवसायाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी जिज्ञासू वृत्तीने व्यवसायाची माहिती घेतली. कार्यक्रमाचे प्रस्तावना ओम एंटरप्रायजेसच्या कल्याणी वाघमोडे यांनी केली.
यावेळी कल्याणी वाघमोडे यांनी व्यवसायबद्दल थोडक्यात संदर्भ माहिती देत असताना व्यवसाय उभारणी करून युवकांना रोजगार उत्पन्न व्हावा, यासाठी बारामतीमध्ये आयटी हब, सोलर पॉवर हब व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच महाराष्ट्रात जनतेला, शेतकरी वर्गाला वीज कपातीच्या संकटाना सामोरे जावे लागते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सोलर पॉवर हब उभे राहायला हवेत, असे निर्देश संबंधित मंत्र्यांना द्यावेत, अशी विनंती करून कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळ देत भाषणात कल्याणी व डॉ. सुजित वाघमोडे यांच्या कामाचे कौतुक करत नवीन व्यवसायास शुभेच्छा दिल्या. सोलर पॉवर सिस्टिमचे महत्व, विजेचा वापर, वीज बचत याबाबत नागरिकांना महत्व पटवून दिले. शिर्सुफळ, गुजरात, सौराष्ट्र मधील सोलर पॉवरचे उदाहरण दिले. डॉ. सुजित वाघमोडे यांनी आभार व्यक्त केले. ज्ञानेश्वर जगताप, सलीम सय्यद, ज्ञानेश्वर बुरूंगले सरांनी सूत्रसंचालन केले.