मोबाईल हरवल्याची एफआयआर न घेतल्यास पोलिसांवरही होणार कारवाई

मुंबई, 6 एप्रिलः जवळपास सर्वजण मोबाईल फोन सर्रासपणे वापरतात. या मोबाईलमध्ये त्यांचे वैयक्तिक माहिती, नंबर, फोटो आणि व्हिडिओ असतात. यासह अनेक जण ऑनलाईन बँकही वापरतात. अशा परिस्थितीत एखाद्याचा फोन हरवणं ही मोठी समस्या असल्याचं मत मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी म्हटले आहे.

हिच बाब लक्षात घेत पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक आदेश काढले आहे. मोबाईल फोन हरवल्यास पोलीस ठाण्यात एफआरआय नोंदविला जाईल, असे या आदेशात म्हटले आहे. तसेच जर पोलिसांनी एफआरआर नोंदवण्यास नकार दिला, तर त्यांच्यावरही आयपीसी कलम 168- ए नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

आता पर्यंत पोलीस मोबाईल हरवल्याप्रकरणी फक्त हरवल्याची तक्रार नोंदवत होते. मात्र आता पोलिसांना यासंदर्भात एफआयआर दाखल करावी लागणार आहे.

अनेकांना मोबाईल हरवल्यानंतर काय केलं जातं हे समजत नाही. ते फक्त पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि तक्रार नोंदवतात. मात्र या परिस्थितीत पोलिसांनी नक्की काय कारवाई केली, हे त्यांना समजत नाही. तसेच मिसिंग रिपोर्ट आणि एफआयआर यात काय फरक आहे, असा प्रश्न देखील अनेकांच्या मनात उपस्थित होतो.

अशा परिस्थितीत तो व्यक्ती पोलिसांकडून मिळालेल्या हरवल्याची स्लिप समोरच्या व्यक्तीला देते आणि नवीन सिम घेतो. गहाळ अहवाल दाखवल्यानंतर, पुढील तपास आवश्यक नाही. पण एकदा एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करावी लागेल आणि पोलिसांना त्यांचा तपास अहवालही दाखल करावा लागेल.

हरवलेल्या किंवा चोरीचे बहुतेक फोनची स्क्रीन आणि बॅटरी काढून टाकल्यानंतर, ते कचऱ्यात टाकली जाते. उर्वरित मोबाईल सीमेपलीकडे विकले जातात. जेणेकरून ते आयएमईआय (इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी) द्वारे देखील शोधले जाऊ शकत नाहीत. ज्यामुळे आतापर्यंत आपले हरवलेले मोबाईल मिळाले नव्हते.

परंतु आता पोलीस आयुक्तांच्या या नव्या आदेशानंतर हरवलेले मोबाईल सापडण्याची शक्यता अधिक वाढली आहे. अनेकवेळा अशा गोष्टी समोर आल्या आहेत की, त्याचा आयएमईआय नंबर देखील सॉफ्टवेअर वापरून बदलला जातो. अशा स्थितीत पोलिसांनी तपास सुरू केल्यावर या प्रकरणातून बाहेर येईल आणि यात सहभागी असलेले लोक तुरुंगात जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *