मोबाईल टॉवर विरोधात स्थानिकांचा एल्गार

बारामती, 19 एप्रिलः बारामती शहरातील सर्वोदय नगरमध्ये एका सदनीकेत मोबाईल टॉवर उभारण्याचा काम काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र या टॉवरच्या कामामुळे आसपास राहणाऱ्या स्थानिकांना अडचणी होत आहे. यामुळे सर्व स्थानिकांनी एकत्र येत बारामती नगर परिषदेला या टॉवर विरोधात अर्ज दाखल केला आहे.

शहरातील सर्वोदय नगरमध्ये हौसिंग सोसायटीची घरे आहे. या घरामध्ये कमर्शियल फायद्यासाठी सचिन जाधव यांच्या राहत्या घरात बेकायदेशीर रित्या आयडिया कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे. तसेच हा मोबाईल टॉवर उभारण्यासाठी बारामती नगर परिषदेची कोणतीही परवानगी घेतली नाही. तसेच या मोबाईल टॉवरमुळे भविष्यात आरोग्याचा प्रश्न आणि संभाव्य मोठा अपघात यामुळे सर्वोदय नगर आणि चंद्रमणी नगर येथील स्थानिकांनी याला विरोध करत अर्ज केला आहे.

स्थानिकांनी मोबाईल टॉवरची वीज पुरवठा खंडित करावा यासाठी अर्ज केला आहे. तसेच बारामती नगर परिषदेने सदर टॉवर कारवाई करत तो काढा, अन्यथा धरणे आंदोलन करु, असा इशारा अर्जाद्वारे केला आहे. सदर मोबाईल टॉवरचा प्रश्न बारामती शहर आरपीआय (अ) चे शहराध्यक्ष तथा पत्रकार अभिजीत कांबळे, पत्रकार विराज शिंदे, माजी नगरसेविका आरती गव्हाळे, पायल चव्हाण, साक्षी गायकवाड, उर्मिला गायकवाड, गणेश जाधव, पूजा मोरे, संजना मोरे, सीमा मोरे, निर्मला शिंदे, वर्षा वाघमारे यासह सर्वोदय नगर व चंद्रमणी नगरच्या स्थानिकांनी उचलून धरला आहे. सदर मोबाईल टॉवर विरोधात बारामती नगर परिषद कारवाई करणार की नाही, हे येत्या काळात समोर येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *